

Maria Corina Machado Wins 2025 Nobel Peace Prize for Her Fight for Democracy
E sakal
लेखक : सुदर्शन कुडचे
नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. नोबेल शांतता पुरस्कार २०२५ ची घोषणा नॉर्वेजियन नोबेल समितीने १० ऑक्टोबर २०२५ रोजी ओस्लो येथे केली. या वर्षी व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि लोकशाही कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?
मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या आणि लोकशाही, नागरिकाधिकार आणि शांतिपूर्ण संघर्षासाठी ओळखल्या जातात. त्यांना “आयरन लेडी ऑफ व्हेनेझुएला” असं नाव मिळालं आहे. १९९९ नंतर, व्हेनेझुएलामध्ये हुकूमशाही वाढली आणि मचाडो यांनी नागरिकांच्या हक्कांसाठी, लोकशाहीसाठी आणि मुक्त निवडणुकीसाठी दीर्घकाळ संघर्ष केला. २०२४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासही बंदी घालण्यात आलेली होती.