MPSC Esaay Writing
Esakal
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध (Essay) हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा असला तरी, 'पृथ्वीवर प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसं आहे, पण प्रत्येकाच्या लोभासाठी नाही' यावर निबंध लिहा असा प्रश्न आला की मुलं गोंधळात पडतात.
त्यामुळेच निबंध लिहिताना नेमक्या काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायला हवा, या मुद्द्यांची मांडणी कशी करावी या सगळ्याविषयी ज्ञानदीप अकादमीचे वरिष्ठ प्राध्यापक वैभव खुपसे यांनी ‘सकाळ स्टडीरूम’ च्या व्यासपीठावर मार्गदर्शन केले आहे. या लेखाच्या माध्यामातून तत्त्वज्ञानावर आधारित निबंधाची योग्य मांडणी कशी करावी? हे जाणून घेऊया.