Premium|Study Room : एमपीएससी पूर्व परीक्षेचं नियोजन कसं करायचं?

MPSC Prelims 2025 Exam Preparation : एमपीएससी पूर्व परीक्षा आता अगदी तोंडावर आली आहे. या दरम्यान होणाऱ्या चुका, वेळेचे नियोजन, ताणतणावावर नियंत्रण आणि शेवटच्या दिवसांतील तयारीचं महत्त्व
Avoid These Mistakes in MPSC Prelims: Smart Tips for Exam Success

Avoid These Mistakes in MPSC Prelims: Smart Tips for Exam Success

E sakal

Updated on

MPSC Prelims 2025 Preparation Guide: From Revision to Stress Management

महेश शिंदे (संचालक ज्ञानदीप अकॅडमी)

२८ सप्टेंबर रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा आता दारातच येऊन ठेपली आहे. तुम्ही मागच्या काही महिन्यांत केलेला अभ्यास, काढलेल्या नोट्स, सोडवलेल्या टेस्ट सीरिज आणि अनेकदा केलेली revision यानंतर आता फक्त प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जायचं आहे. अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात वेगवेगळ्या भावना येणं अगदी स्वाभाविक आहे. कुणाला पेपरची उत्सुकता आहे, कुणाला भीती वाटत आहे की, मी पास होईल का? मला पेपर ला आठवेल का?, तर कुणाला परीक्षेचे टेन्शन येत आहे.

हीच स्थिती प्रत्येकाची असते, त्यामुळे ‘फक्त मलाच टेन्शन येतंय’ असा गैरसमज करून घेऊ नका. खरेतर ही मानसिक अवस्था सर्वसामान्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भावनांना कसं हाताळायचं हे समजून घेतलं पाहिजे. ही परीक्षा फक्त ज्ञानाची किंवा अभ्यासाची नाही, तर ती तुमच्या टेंपरामेंटची कसोटी आहे. गेल्या काही महिन्यांत घेतलेले कष्ट, केलेला अभ्यास या दोन तासांच्या पेपरमध्ये आपल्याला किती शांतपणे आणि प्रभावीपणे उतरवता येतात, हेच खरं यशाचं गमक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com