Premium|Study Room : विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न; शिक्षण सचिव म्हणून तुम्ही काय कराल?

NEET Paper Leak : नीट प्रश्नपत्रिका गळतीनंतर शिक्षण सचिवांसमोरील नैतिक द्वंद्व, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा निर्णय, राजकीय दबाव, पारदर्शक चौकशी आणि निष्पक्ष पुनर्परीक्षेच्या पर्यायांचा अभ्यासपूर्ण वेध.
NEET Paper Leak

NEET Paper Leak

esakal

Updated on

१. प्रकरणाची पार्श्वभूमी

ही केस स्टडी NEET प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळतीमुळे निर्माण झालेल्या नैतिक आणि प्रशासकीय पेचप्रसंगावर आधारित आहे. प्रश्नपत्रिका गळतीमुळे काही विद्यार्थ्यांना अन्याय्य लाभ मिळाला, तर इतर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा न्याय्य राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण होऊन आंदोलन सुरू झाले. शिक्षण सचिव म्हणून तुम्हाला राजकीय दबाव, माध्यमांची टीका आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्यतेच्या मागणीमध्ये योग्य निर्णय घ्यायचा आहे. या प्रकरणात न्याय, सत्य, जबाबदारी, निष्पक्षता आणि सर्वसमावेशकता ही प्रमुख नैतिक मूल्ये आहेत.

२. केस स्टडीमधील प्रमुख हितधारक

हितधारक भूमिका व मागणी

  • विद्यार्थी - न्याय्य संधी, परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी

  • पालक - स्वतंत्र चौकशी व दोषींवर कठोर कारवाई

  • कोचिंग क्लासेस  - प्रश्नपत्रिका गळतीचा लाभ घेतल्याचा संशय

  • राजकीय व्यक्ती  - राजकीय नुकसान टाळण्यासाठी तडजोडीची भूमिका

  • माध्यमे - प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे

  • शिक्षण सचिव - (तुम्ही) निष्पक्ष, कायदेशीर व न्याय्य निर्णय घेणे

  • न्यायालय - स्वतंत्र चौकशी आणि कायदेशीर कारवाई सुनिश्चित करणे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com