

Creative Destruction and Knowledge – The Secret Behind Economic Progress
E sakal
श्रीकांत जाधव
या वर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने जागतिक आर्थिक विकासाचा एक मूलभूत मंत्र पुन्हा अधोरेखित केला आहे.
देश तेव्हाच अधिक काळ आणि अधिक गतीने प्रगती करू शकेल, जेव्हा जुन्या कल्पना आणि तंत्रज्ञानाला बाजूला करून नवीन विचारांना जागा दिली जाते आणि त्या नवीन कल्पना समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचतात
जोएल मोकिर यांच्या मते, विकासाची खरी ताकद ही ज्ञान, कौशल्य आणि प्रयोगशीलतेच्या मजबूत पायावर उभी असते. उपयुक्त ज्ञानाचा साठा, त्या ज्ञानाला प्रत्यक्ष तंत्रज्ञानात रूपांतर करण्याची क्षमता आणि प्रयोगांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था हे विकासाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत.
फिलिप अघिओं आणि पीटर हाउइट यांच्या मते, आर्थिक प्रगती ही सतत नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात त्या ‘सर्जनशील विध्वंस’ (Creative destruction) या प्रक्रियेतून घडते, ज्यात जुने तंत्रज्ञान आणि व्यावसायिक पद्धती नव्या, अधिक कार्यक्षम उपायांनी बदलल्या जातात.