Premium|Study Room : असहकार आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिली नवी दिशा

Non Cooperation Movement : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकार आंदोलनाने भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव जागृत केली. अहिंसा, सत्य आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध असहकार हीच या आंदोलनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
Non Cooperation Movement

Non Cooperation Movement

esakal

Updated on

लेखक : विपुल वाघमोडे

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी सुरू केलेले असहकार आंदोलन (Non-Cooperation Movement) हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते. १९२० साली सुरू झालेल्या या आंदोलनाने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनआंदोलन उभे केले. हे आंदोलन केवळ राजकीय नव्हते, तर सामाजिक, आर्थिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित होते.

असहकार आंदोलनाची पार्श्वभूमी

पहिल्या महायुद्धानंतर भारतातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अन्यायकारक कर लादले, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या. १९१९ मधील रॉलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेमुळे भारतीय जनतेत संतापाची लाट निर्माण झाली. गांधीजींना असे वाटले की ब्रिटिश सरकार भारतीयांच्या सहकार्यामुळेच टिकून आहे; म्हणून जर भारतीयांनी सहकार्य बंद केले, तर ब्रिटिश सत्ता कोलमडेल.

गांधीजींचे असहकार आंदोलनावरील विचार

गांधीजींच्या मते, ‘अहिंसा आणि सत्य’ हीच संघर्षाची खरी शस्त्रे होती. त्यांनी भारतीयांना हिंसाचार न करता ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचे आवाहन केले. त्यांचे मत होते की, ‘ब्रिटिश सरकार भारतीयांच्या सहकार्यावर चालते; हे सहकार्य काढून घेतले, तर स्वराज्य प्राप्त होईल.’

गांधीजींनी स्वदेशी वस्तूंचा वापर, खादी प्रचार, विदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यावर भर दिला. त्यांनी लोकांना सरकारी नोकऱ्या, न्यायालये, शाळा आणि पदव्या यांचा त्याग करण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com