
चीन, नेपाळसह देशविदेशातील गोष्टींची माहिती सकाळ डायरीमध्ये
ई सकाळ
आंतरराष्ट्रीय घडामोडी
१)२०२५ मधील SCO शिखर परिषदेदरम्यान चीनची मदत जाहीर
२०२५ मधील SCO (शांघाय सहकार्य संघटना) शिखर परिषदेदरम्यान चीनने सदस्य देशांसाठी २ अब्ज डॉलर्सच्या अनुदान व कर्जाची घोषणा केली.
यामध्ये १०० स्थानिक प्रकल्प, शिष्यवृत्तीत वाढ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या ‘तियानजिन घोषणा’ समाविष्ट आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ वी SCO शिखर परिषद (तियानजिन) येथे भारताचे Vision मांडले
त्यांनी सुरक्षा, संपर्क आणि संधी (Security, Connectivity, Opportunity) या तीन गोष्टींवर भर दिला.
तसेच Civilizational Dialogue Forum स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आणि जागतिक शासकीय सुधारणांना पाठिंबा दर्शविला.
पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा निषेध
तियानजिन घोषणेत २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच, दहशतवादाविरोधात संयुक्त भूमिका व गुप्तचर माहितीची देवाणघेवाण वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.