

Sakal Plus Study Room
esakal
पुणे : प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा, योग्य दिशा आणि अभ्यासाचे नियोजन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला 'सकाळ प्लस स्टडीरूम : ग्रेट भेट' हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आपल्या अनुभवांची शिदोरी त्यांच्यासमोर उलगडली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रास्ताविकानंतर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रशासकीय प्रवासातील अनुभव, आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात आणि समाजासाठी काम करताना मिळालेले समाधान विद्यार्थ्यांसमोर मांडले. प्रशासकीय सेवेत येण्यामागील उद्देश काय असावा आणि या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल कसा घडवता येतो, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.