

Semiconductor Industry in India
esakal
आजच्या डिजिटल युगात सेमीकंडक्टर चिप्सला विशेष महत्त्व आहे. मोबाईलपासून ऑटोमोबाईलपर्यंत आणि एआयपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक तंत्रज्ञानांचा आधार या छोट्याशा चिपवर आहे. त्यामुळेच जेव्हा जेव्हा सेमीकंडक्टरची उत्पादन-पुरवठा साखळी विस्कळीत होते, तेव्हा तेव्हा जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचे हादरे बसतात. आज याच सेमीकंडक्टर चिप्समुळे भारताची जगाच्या अर्थव्यवस्थेत चर्चा होत आहे. कारण भारत सेमीकॉन इंडिया २०२६च्या माध्यमातून जागतिक कंपन्यांना भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
देशात फॅब आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यासोबतच चिप डिझाइन, आरॲंडडी आणि कुशल मनुष्यबळावरही भर दिला जात आहे. मात्र, या क्षेत्रात मोठी गुंतवणूक, तंत्रज्ञानाची गुंतागुंत आणि दीर्घकाळ चालणारी विकास प्रक्रिया यांसारखी आव्हानेही आहेत. ही सर्व आव्हाने पार करून भारत जर चिप निर्मितीबरोबरच संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था उभी करू शकला, तर भविष्याच्या दृष्टीने ही परिषद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरू शकते.