

POSH कायदा आणि महिलांची सुरक्षितता
E sakal
How India Can Build a Safer and Respectful Environment for Women
सत्यजित हिंगे
भारतीय समाज तंत्रज्ञान, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवान प्रगतीच्या मार्गावर झेपावत असताना, महिलांविरुद्ध वाढणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना आपली सामाजिक संवेदनशीलता किती कमकुवत आहे हे ठळकपणे दाखवतात.
‘स्त्री सशक्तीकरण’ ही घोषणा प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित होत असताना, तिच्याच सुरक्षिततेचा प्रश्न आज पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे येत आहे. अलीकडील पश्चिम बंगालमधील दुर्गापूर मेडिकल कॉलेज प्रकरण हे त्या वास्तवाचे नवे, पण दुर्दैवी प्रतिबिंब आहे.