

Responding to Misinformation: Ethical Issues in Social Media Use
E sakal
लेखक : अभिजित मोदे
डिजिटल युगात सोशल मीडियावरून कुणी तुमच्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल अपप्रचार करू लागलं तर त्यावेळी काय कराल, हा प्रश्न केस स्टडीअंतर्गत येऊ शकतो. त्याला उत्तर आणि ही केस स्टडी सोडवण्याची गुरुकिल्ली, वाचा सकाळ स्टडी रुमच्या या विशेष लेखात.
How Should a Government Officer Handle Fake Propaganda on Social Media?
सरकारी मंत्रालयात एक जबाबदार पद भूषवणाऱ्या व्यक्ती म्हणून तुम्ही कार्यरत आहात. एक दिवस सकाळी तुमच्या ११ वर्षीय मुलाच्या शाळेतून मुख्याध्यापकांकडून तुम्हाला तातडीने बोलावण्यात येते.
तुम्ही शाळेत जाता आणि मुलाला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पाहता. ते सांगतात की, तुमचा मुलगा वर्गातील वेळेत मैदानावर भटकत होता. वर्गशिक्षिका सांगतात की, सध्या तो एकटा राहू लागला आहे, प्रश्नांना उत्तर देत नाही आणि फुटबॉल चाचणीमध्येही चांगली कामगिरी करू शकला नाही. तुम्ही मुलाला घरी नेता आणि सायंकाळी पत्नीबरोबर बोलून मुलाच्या वागण्यात बदल का झाला, हे जाणून घेता.