अलीकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाच्या पुनरुज्जीवनामुळे पुन्हा एकदा सीमापार दहशतवादाचा धोका अधोरेखित झाला आहे. प्रत्युत्तर म्हणून भारताने ''ऑपरेशन सिंदूर'' सुरू केले. हे पाऊल म्हणजे घुसखोरांना निष्क्रिय करण्यासाठी आणि सीमेपलीकडे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्यासाठी एक निर्णायक दहशतवाद विरोधी मोहीम आहे. भारताने राजनैतिक संपर्क वाढवला आहे.दहशतवादाची मुळे उघड करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहमती निर्माण करण्यासाठी प्रमुख जागतिक व्यासपीठांवर उच्चस्तरीय शिष्टमंडळे पाठवली आहेत.