Premium|UPSC MPSC seminar Mumbai : एमपीएससीच्या बदलत्या पॅटर्नमध्ये यश कसे मिळवाल? तज्ज्ञांचा उत्तर लेखनावर भर; यशस्वी अधिकाऱ्यांनी उलगडला यशाचा प्रवास

Career Guidance Seminar : हिंदुजा महाविद्यालयात 'सकाळ' आणि 'यिन'च्या संयुक्त विद्यमाने यूपीएससी-एमपीएससी मार्गदर्शन संपन्न; अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला यशाचा कानमंत्र आणि 'सकाळ प्लस स्टडी रूम' उपक्रमाचा झाला शुभारंभ.
UPSC MPSC seminar Mumbai

UPSC MPSC seminar Mumbai

esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील वरळी येथील नामांकित के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयात बी.कॉम (फायनान्शिअल मार्केट्स) विभाग, सकाळ स्टडी ग्रुप आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (YIN) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रेट भेट’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यूपीएससी (UPSC) आणि एमपीएससी (MPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा एक उत्तम संगम ठरला.

हा कार्यक्रम १५ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात, या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) नवीन पंजाबी आणि कार्यक्रम समन्वयक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ) मधील सहाय्यक संचालक शुभम तिजारे, गट विकास अधिकारी (BDO) सूरज गावडे, ज्ञानदीप अकादमीचे वरिष्ठ शिक्षक ॲड. वैभव खुपसे आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री रिया खानोलकर उपस्थित होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com