

Supreme Court Pending Cases
esakal
लेखक : अभिजित मोदे
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अलीकडेच वाढविण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या संमतीनंतर सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची संख्या ३४ वरून ३८ झाली आहे. या वाढीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश आहे. सरन्यायाधीश वगळता इतर न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ करण्यात आली आहे.
हा निर्णय न्यायालयात प्रलंबित असलेल्या मोठ्या संख्येतील खटल्यांचा जलद निपटारा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा भार, घटनात्मक प्रकरणांची वाढती संख्या आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देण्याची गरज यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.