
India’s Strategic Concerns Amid Thailand-Cambodia Border Conflict
लेखक: गौरवकुमार बाळे
थायलंड आणि कंबोडिया हे आग्नेय आशियामधील शेजारी देश आहेत. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून सीमेसंदर्भात वाद चालू आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहे प्रेह विहार मंदिर, जे दोन्ही देशांच्या सीमारेषेजवळ वसलेले आहे. या वादामुळे दोघांमध्ये वेळोवेळी लष्करी चकमकी झाल्या असून, शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत.