

Indian constitutional law
esakal
कोएल्हो प्रकरण २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आले होते. या प्रकरणामध्ये मुख्यत्वे नवव्या अनुसूचीतील कायद्यांची संविधानाशी सुसंगतता आणि त्यांच्यावर न्यायालयीन परीक्षण शक्य आहे का, हा प्रश्न होता. संविधानातील अनुच्छेद 31-B आणि ९ वी अनुसूची यांच्याशी संबंधित हा निकाल होता. पूर्वीसुद्धा काही कायदे ९ व्या अनुसूचीतील असल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयीन परीक्षण शक्य नसल्याचा समज होता. मात्र, कोएल्हो निर्णयानंतर सत्ता विभागणी आणि मूलभूत अधिकारांची सुरक्षा यासाठी न्यायालयाची भूमिका अधिक स्पष्ट झाली.