Premium|Study Room : युद्धविराम की तात्पुरती शांतता? पश्चिम आशियाचे वास्तव काय?

West Asia Conflict Analysis : पश्चिम आशियातील युद्धाचे ढग तात्पुरते विरले असून पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला आहे. होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्याच्या संकेतामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला असून परिस्थिती अजूनही नाजूक आहे.
West Asia Conflict Analysis

West Asia Conflict Analysis

esakal

Updated on

लेखक : गौरव बाळे

प्रस्तावना
पश्चिम आशिया हा जागतिक राजकारणातील सर्वात संवेदनशील प्रदेशांपैकी एक मानला जातो. येथे घडणाऱ्या घटना केवळ प्रादेशिक मर्यादेत राहत नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर थेट परिणाम करतात. या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील अलीकडील संघर्ष आणि त्यानंतर झालेला युद्धविराम हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. या युद्धविरामामुळे तात्पुरते तणाव कमी झाले असले, तरी परिस्थिती अजूनही नाजूक आणि अनिश्चित आहे.

तणावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी !

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा अनेक दशकांपासून चालत आलेला आहे. परंतु २०२५-२६ या कालावधीत या तणावाने अधिक तीव्र स्वरूप घेतले. इराणमधील अंतर्गत अस्थिरता, अणुऊर्जा कार्यक्रमावरील वाद आणि प्रादेशिक राजकारणातील स्पर्धा या सर्व घटकांनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली. २०२६ च्या सुरुवातीला अमेरिकेने आणि त्यांच्या सहयोगींनी इराणमधील महत्त्वाच्या लष्करी आणि अणुऊर्जा-संबंधित ठिकाणांवर हल्ले केले, ज्यामुळे संघर्ष उघड स्वरूपात समोर आला. त्यानंतर इराणनेही प्रतिहल्ले करून अमेरिकन तळांवर आणि त्यांच्या सहयोगींवर दबाव वाढवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com