Premium|Study Room : मानसिक कणखरता असेल तर कोणत्याही संकटावर मात करणे शक्य..!

Titanic Internal Failure Metaphor : टायटॅनिकचे अपयश हे बाह्य महासागरामुळे नव्हे, तर 'पोलादी आवरणाला पडलेल्या भगदाडामुळे' झाले; याचप्रमाणे व्यक्ती, कंपन्या (IL&FS, PNB घोटाळा) आणि राष्ट्रांचा (रोमन, मुघल साम्राज्य) ऱ्हास हा आंतरिक भ्रष्टाचार, नैतिक स्खलन आणि प्रशासकीय अपयशामुळे होतो.
Titanic Internal Failure Metaphor

Titanic Internal Failure Metaphor

esakal

Updated on

निखिल वांधे

एप्रिल १९१२ च्या त्या काळरात्री, ''कधीही न बुडणारे'' अशी ख्याती असलेले ''आरएमएस टायटॅनिक'' अटलांटिक महासागराच्या गोठवून टाकणाऱ्या पाण्यात अदृश्य झाले आणि आपल्यासोबत १५०० हून अधिक आत्म्यांना जलसमाधी मिळाली. महासागराच्या रौद्र रूपाचा सामना करण्यासाठी या जहाजाची रचना करण्यात आली होती; त्याचे पोलादी आवरण जगातील सर्वात धोकादायक जलप्रवाहांवर मात करण्यासाठीच बनवले होते. तरीही, सभोवतालचा अथांग महासागर त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला नाही तर त्याच्या मजबूत आवरणाला पडलेले एक भगदाड आणि त्यातून आत शिरलेले पाणी, जे कप्प्याकप्प्याने पसरत गेले, तेच या महाकाय जहाजाच्या अंताचे कारण ठरले. ही सागरी शोकांतिका मानवी अस्तित्वासाठी एक अत्यंत अर्थपूर्ण रूपक (Metaphor) आहे. बाह्य आव्हाने, ती कितीही भयंकर असली तरी, क्वचितच आपला नाश करतात; परंतु आपण आपल्या आंतरिक संरक्षण व्यवस्थेला भेदून ज्या नकारात्मक विचारांना, विषारी संबंधांना, भ्रष्टाचाराला किंवा ढासळत्या मूल्यांना आत प्रवेश करू देतो, तेच आपल्या पतनाला कारणीभूत ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com