
TRP साठी सनसनाटी की समाजहित? पत्रकारितेतील नैतिक संघर्षाची खरी कसोटी
E sakal
लेखक : अभिजित मोदे
प्रश्न : आपण एका न्यूज चॅनेलमधील संघर्ष करणारे रिपोर्टर आहात आणि Editor-in-Chief कडून टी.आर.पी. (TRP) वाढवण्यासाठी काहीतरी सनसनाटी बातमी आणण्याचा मोठा तणाव आहे. आपण अलिकडील सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालावर एका अल्पसंख्याक समुदायाच्या प्रसिद्ध धार्मिक नेत्याची मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत त्या नेत्याने उत्तेजक विधान केले असून समुदायातील सदस्यांना कोर्टाच्या निकालाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले आहे. ही मुलाखत प्रसारित केल्यास समाजात जातीय तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
आपल्याला पूर्ण माहिती आहे की ही मुलाखत Editor-in-Chief ला दिल्यास ते टीआरपीसाठी नक्कीच प्रसारित करतील. या मुलाखतीमुळे आपल्या करिअरला मोठ्या प्रमाणात गती मिळू शकते. अशा परिस्थितीत, ही मुलाखत Editor-in-Chief ला देणे योग्य ठरेल का?
(क) आपणास सामोरे जावे लागणारा नैतिक संघर्ष ओळखा.
(ख) जबाबदार रिपोर्टर म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्ये विशद करा आणि आपण कोणत्या पद्धतीने कृती करावी, हे सुचवा.