
भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांपैकी एक म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा. यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे केस स्टडी. केस स्टडी देताना कोणतेही मुद्दे घेतले जाऊ शकतात. कधी त्यात चालू घडामोडींचा संदर्भ द्यावा लागतो तर कधी एथिक्समधल्या प्रश्नांचा. प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करताना विद्यार्थ्यांसमोर कोणत्या अडचणी उभ्या राहू शकतात, याविषयी केस स्टडीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यासाठीच काही खास टिप्स...