
डी गुकेश हे नाव जगभरात बुद्धिबळाच्या पटावर झळकतं आहे. मॅग्नस कार्लसनसारख्या बलाढ्या जेत्याला हरवून तर गुकेश भलताच प्रसिद्ध झालाय. त्यानंतर कार्लसनची प्रतिक्रिया आणि त्यावर गुकेशचं अत्यंत शांतपणे व्यक्त होणं हा तर अनेक रील्सचा विषय बनला. गुकेशविषयीचं कौतुकच त्यातून वाहत होतं.