
Cloudburst Crisis 2024–25: The Hidden Dangers of Climate Instability in the Himalayas
निखिल वांधे
गेल्या काही वर्षांत, विशेषतः २०२४ आणि २०२५ च्या मान्सूनमध्ये, हिमाचल प्रदेशाला ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या विनाशकारी पुरांचा मोठा फटका बसला. यासोबतच ढगफुटीमुळे भूस्खलनाच्या घटनासुद्धा घडून आल्या.
मंडी, कुल्लू, शिमला आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी या घटना घडल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, रस्ते वाहून गेले, पूल कोसळले आणि हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
हवामान बदलामुळे हिमालयातील हवामान अधिक अस्थिर झाल्याचे दिसून येते आणि अनियोजित बांधकामामुळे धोका वाढल्याचेही निरीक्षण आहे. याच संदर्भात आपण ढगफुटीबद्दल अधिक माहिती समजून घेऊया