भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पासून स्वातंत्र्यलढ्यातील काकोरी कटापर्यंत, भारतीय संविधानातील कलमांपासून ते आधुनिक सायबर गुन्ह्यांपर्यंत – भारताचा प्रवास विज्ञान, समाज, राजकारण आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांत दिसून येतो. .१. ३० जुलै २०२५ रोजी इस्रोने जीएसएलव्ही-एफ १६ रॉकेटने कोणता उपग्रह अवकाशात पाठवला? १. चंद्रयान-३ २. निसार ३. मंगलयान ४. कार्टोसॅट-३२. निसार उपग्रहामध्ये कोणते रडार वापरले आहेत जे दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीचे निरीक्षण करतात? १. नासाचा एल-बँड रडार आणि इस्रोचा एस-बँड रडार २. इस्रोचा एल-बँड रडार आणि नासाचा एस-बँड रडार ३. नासाचा एक्स-बँड रडार आणि इस्रोचा के-बँड रडार ४. फक्त नासाचा एल-बँड रडार३. निसार उपग्रहाचा प्रमुख उपयोग खालीलपैकी कोणासाठी होणार नाही? १. भूस्खलन आणि हिमनद्या निरीक्षण २. जंगलांचा अभ्यास आणि किनारपट्टी निरीक्षण ३. भारतातील अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर शुल्क आकारणे४. पिकांचे निरीक्षण.Premium|Study Room: नागरी सेवक आणि नैतिक मूल्ये.४. NISAR उपग्रहाची ओपन डेटा पॉलिसी म्हणजे काय? १. डेटा फक्त इस्रोसाठी उपलब्ध होईल २. उपग्रहाने गोळा केलेला डेटा १–२ दिवसांत सर्वांसाठी सार्वजनिक होईल ३. डेटा केवळ अमेरिकेसाठी उपलब्ध होईल ४. डेटा फक्त पिकांचे निरीक्षण करण्यासाठी वापरला जाईल५. NISAR उपग्रहाच्या ओपन डेटा पॉलिसीमुळे खालीलपैकी कोणते परिणाम घडू शकतात? १. डेटा केवळ संशोधक आणि शैक्षणिक संस्थांपुरता मर्यादित राहील २. उपग्रहाचा डेटा फक्त भारत सरकारकडे साठवला जाईल ३. हा डेटा व्यापारी उद्देशासाठी विकला जाणार आहे ४. हवामान, पर्यावरण आणि आपत्ती संशोधनासाठी जागतिक पातळीवर सर्वांना लाभ होईल६. India-U.S. TRUST उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? १. फक्त लष्करी सहकार्य वाढवणे २. महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच नागरी अवकाश कार्यक्रमांमध्ये सहकार्य वाढवणे ३. फक्त कृषी उपग्रह पाठवणे ४. अमेरिकेत निर्यात वाढवणे.७. परिसीमन आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही, याचा उल्लेख भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे? १. कलम ८२ २. कलम १७०(२) ३. कलम ३२९(अ) ४. कलम ३२४८. काकोरी कट ही घटना केव्हा घडली होती? १. १५ ऑगस्ट १९४७ २. ९ ऑगस्ट १९२५ ३. २६ जानेवारी १९५० ४. १२ मार्च १९३०९. काकोरी कट ऑपरेशनचे नेतृत्व कोणत्या क्रांतिकारकाने केले होते? १. भगतसिंग २. चंद्रशेखर आझाद ३. रामप्रसाद बिस्मिल ४. सुभाषचंद्र बोस१०. NCIIPC मुख्यतः कोणत्या बाबीच्या सुरक्षेसाठी कार्य करते? १. खासगी बँकिंग व्यवहार २. महत्त्वाच्या सरकारी व्यवहार ३. सोशल मीडिया अकाउंट्स ४. ई-कॉमर्स व्यवहार.११. भारतीय संविधानाचा कलम १४ काय सांगतो? १. सर्वांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार २. सर्वांना कायद्यासमोर समानता ३. जातीवर आधारित आरक्षण ४. धार्मिक स्वातंत्र्य१२. कलम १५ भारतातील लोकांना कोणत्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते? १. शिक्षण, निवडणूक, रोजगार २. जात, धर्म, लिंग ३. उत्पन्न, व्यवसाय ४. भाषेवर१३. भारतीय संविधानाचा कलम २१ कोणत्या हक्काशी संबंधित आहे? १. जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क २. मतदानाचा हक्क ३. शिक्षणाचा हक्क ४. धर्माचा हक्क१४. कलम २५ भारतातील नागरिकांना काय अधिकार देते? १. शिक्षण घेण्याचा अधिकार २. धर्म आणि आचरण स्वातंत्र्य ३. निवडणूक लढण्याचा अधिकार ४. सामाजिक सुरक्षा.Premium |Study Room : प्रशासनातील सभ्यता कशी जोपासावी?.१५. प्रेह विहार मंदिराचा सीमेवरील वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?१. भारत आणि श्रीलंका२. नेपाळ आणि भूतान३. थायलंड आणि कंबोडिया४. म्यानमार आणि लाओस१६. काकोरी कट ऑपरेशनने कोणत्या जाहीरनाम्याला प्रत्यक्ष कृतीचा आधार दिला?१. ‘यंग इंडिया’२. ‘द रिव्होल्यूशनरी’३. ‘हिंदुस्तान टाईम्स’४. ‘केसरी’.१७. विशेष विवाह अधिनियम, १९५४ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? १. हा अधिनियम केवळ एकाच धर्मातील व्यक्तींनाच विवाह करण्याची परवानगी देतो. २. या अधिनियमाचा संबंध केवळ वारसा हक्काशी आहे. ३. या अधिनियमांतर्गत विवाह करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. ४. दोन भिन्न जातींतील किंवा धर्मांतील व्यक्ती या अधिनियमांतर्गत विवाह नोंदवू शकतात.१८. सत्यपाल मलिक यांनी २०१८ ते २०१९ दरम्यान कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केले? १. गोवा २. जम्मू-कश्मीर ३. बिहार ४. मेघालय१९. खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी कधीही कार्यभार सांभाळलेला नाही? १. जम्मू आणि काश्मीर २. गोवा ३. मेघालय ४. केरळ.२०. सत्यपाल मलिक यांनी कोणत्या क्षेत्रातील जनहित विषयांवर प्रखर वक्तृत्व केले? १. फक्त शिक्षण २. कृषी, शेतकरी, महिला खेळाडू आणि सामान्य जनहित ३. फक्त लष्करी विषय ४. फक्त नागरी प्रशासन२१. ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? १. महात्मा गांधी २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३. ज्योतिराव फुले ४. पंडित नेहरू२२. परिसीमन म्हणजे काय? १. निवडणूक निकाल जाहीर करणे २. लोकसंख्येच्या बदलानुसार निवडणूक क्षेत्रांच्या सीमा ठरवणे ३. नवीन राज्य निर्माण करणे ४. लोकसंख्या मोजणी करणे२३. ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय? १. सायबर फसवणुकीचा प्रकार ज्यात बनावट अधिकारी अटक दाखवून पैशांची मागणी करतात २. पोलिसांकडून ऑनलाईन अटक प्रक्रिया ३. न्यायालयीन आदेशानुसार झालेली ई-अटक ४. गुन्हेगारांना डिजिटल तुरुंगात ठेवण्याची पद्धत२४. प्रेह विहार मंदिर UNESCO जागतिक वारसा यादीत कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले? १. २००५ २. २००६ ३. २००८ ४. २०१०२५. भारतामध्ये Delimitation Commission ची नेमणूक कोण करतो? १. भारताचे राष्ट्रपती २. भारताचे पंतप्रधान ३. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ४. सर्वोच्च न्यायालय(या प्रश्नांची उत्तरं 'सकाळ स्टडीरूम'च्या व्हॉट्सअप ग्रूपवर मंगळवारी मिळतील. )अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.