सकाळ स्टडी रूममार्फत खालील प्रश्न दिले आहेत. या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधण्याचा प्रयत्न करा. UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी हे प्रश्न उपयुक्त आहे..१. BRICS ही संघटना मूलतः कोणत्या वर्षी स्थापन झाली?१. २०२१२. २००६३. २०१०४. २०१४२. २०२४ मध्ये BRICS+ मध्ये कोणत्या देशांचा समावेश झाला?१. सौदी अरेबिया, इराण, युएई, इजिप्त, इथिओपिया२. पाकिस्तान, अर्जेंटिना, इंडोनेशिया, सिरिया३. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, ब्राझील४. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, फ्रान्स.३. BRICS बँकेचे अधिकृत नाव काय आहे?१. न्यू डेव्हलपमेंट बँक२. वर्ल्ड डेव्हलपमेंट बँक३. ब्रिक्स मॅानेटरी फंड४. ग्लोबल साऊथ बँक४. पेट्रो डॉलर संकल्पना कोणत्या वर्षी सुरू झाली?१. १९६०२. १९७४३. १९८५४. २०००.५. खालीलपैकी कोणत्या घटकाचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होतो?१. आयटी सेवा निर्यात२. उत्पादन शुल्क आणि VAT३. कृषी अनुदान४. पर्यटन कर६. अमरावती शिल्पकलेचा उत्कर्ष कोणत्या कालखंडात झाला होता?१. इ.स.पू. ५ वे ते ४ थे शतक२. इ.स.पू. २रे शतक ते इ.स. ३रे शतक३. इ.स. ६ वे ते ८ वे शतक४. इ.स. १० वे ते १२ वे शतक.७. अमरावती शिल्पकलेत प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा दगड वापरण्यात आला आहे?१. काळा ग्रॅनाइट२. लाल वाळूचा दगड३. पांढऱसर चुनखडी दगड४. हिरवा जेड८. अमरावती शिल्पकलेचा प्रारंभिक विकास मुख्यतः कोणत्या राजवंशाच्या कारकिर्दीत झाला?१. सातवाहन२. गुप्त३. चालुक्य४. किदार कुषाण.९. २०२४-२५ मध्ये भारताने बांगलादेशमधून कोणत्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घातले?१. पेट्रोलियम आणि गॅस२. जूट उत्पादने, विणलेले कापड, तयार कपडे आणि प्रक्रिया अन्न३. इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधे४. वाहन आणि लोह-स्टील१०. भारत-बांगलादेश सीमारेषेची एकूण लांबी किती आहे?१. ३,३२३ किलोमीटर२. २,८५६ किलोमीटर३. ४,०९६ किलोमीटर४. ५,०१२ किलोमीटर .११. अलीकडच्या काळात बांगलादेशने कोणत्या देशांशी वाढती जवळीक साधल्याने भारताला धोरणात्मक चिंता निर्माण झाली आहे?१. अमेरिका आणि इंग्लंड२. पाकिस्तान आणि चीन३. नेपाळ आणि भूतान४. रशिया आणि श्रीलंका१२. अलीकडे भारत सरकारने बांगलादेशसाठी नेपाळ आणि भूतान वगळता कोणत्या सुविधेवर बंदी घातली?१. पर्यटक व्हिसा सवलत२. ट्रान्सशिपमेंट सुविधा३. कृषी अनुदान४. पाणी वाटप करार.१३. राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ चे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे?१. २०२८ पर्यंत १० ऑलिंपिक पदके जिंकणे२. फिट इंडिया चळवळ बंद करणे३. सर्व शाळांमध्ये क्रिकेट अनिवार्य करणे४. भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवणे१४. खेलो इंडिया हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?१. २०१२२. २०१४३. २०१७४. २०१९१५. भारताचे पहिले राष्ट्रीय क्रीडा धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले होते?१. १९८४२. १९८२३. १९५१४. २००११६. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?१. १९८२२. १९८४३. १९८६४. १९८८१७. शांघाय सहकार्य संघटना (SCO) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?१. १९९६२. २००१३. २०१७४. २०२३.१८. SCO मध्ये भारत आणि पाकिस्तान कोणत्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले?१. २०१४२. २०२१३. २०१९४. २०१७१९. २०२३ मध्ये SCO मध्ये कोणता देश नववा सदस्य म्हणून सामील झाला?१. तुर्किये२. इराण३. कतार४. मंगोलिया२०. शांघाय स्पिरिट या संकल्पनेमध्ये SCO च्या कार्यपद्धतीचे कोणते तत्त्व प्राधान्याने समाविष्ट आहे?१. द्विपक्षीय संरक्षण करार२. परस्पर विश्वास आणि सामायिक विकास३. केवळ आर्थिक सहकार्य४. लष्करी विस्तारवाद२१. पर्यावरण संवर्धनासाठी ''माझी वसुंधरा मोहीम ६.०'' कोणत्या राज्याने १ एप्रिल २०२५ पासून सुरू केली आहे?१. गुजरात२. महाराष्ट्र३. कर्नाटक४. मध्यप्रदेश२२. ‘अंबुबाची महोत्सव’ दरवर्षी कोणत्या राज्यात गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात साजरा केला जातो?१. आसाम२. ओडिशा३. त्रिपुरा४. पश्चिम बंगाल२३. Axiom Mission ४ (Ax-४) मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय व्योमानॉट कोण ठरले?१. राकेश शर्मा२. शुभांशु शुक्ला३. विवेक जोशी४. दिनेश कुमार या प्रश्नांची उत्तरं स्टडी रूमच्या व्हॉट्सअप ग्रूपवर मिळतील.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.