
LPG Subsidy Made Transparent: The Impact of Cancelling Fake Connections
लेखक : माधव गोखले
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण एलपीजी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर एलपीजी - DBTL किंवा Pratyaksha Hastaantarit Laabh - PAHAL) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनेमुळे घरगुती वापराच्या एलपीजीच्या बनावट आणि निष्क्रिय जोडण्यांबरोबरच आणि एकाच व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या अनेक दुबार (ड्यूप्लिकेट) जोडण्या रोखण्यात सरकारला यश येते आहे.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत एका तारांकित प्रश्नाला नुकत्याच दिलेल्या लेखी उत्तरात डीबीटीएल-पाहल योजनेसंदर्भातील १ जुलै २०२५ पर्यंतचे तपशील दिले. या योजनेच्या प्रभावी वापरामुळे आतापर्यंत ४.०८ कोटी बनावट (घोस्ट अकाउंट्स), दुबार आणि अपात्र एलपीजी जोडण्या रद्द करण्यात आल्याचे पुरी यांनी सांगीतले.