
अभिजित मोदे
आंतरराष्ट्रीय नैतिकता म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय नैतिकता म्हणजे देशांनी एकमेकांशी वागताना काही नैतिक नियम पाळणे. यात सर्व देशांनी शांततेने वागणे, गरीब देशांना मदत करणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि एकमेकांशी प्रामाणिकपणे व्यवहार करणे याचा समावेश होतो.
उदाहरण द्यायचं झालं तर रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना भारताने कोणाचाही पक्ष न घेता दोघांना शांततेचा सल्ला दिला. हेच आंतरराष्ट्रीय नैतिकतेचं उदाहरण आहे.