
लेखक : अभिजित मोदे
आपण नगरपालिका महामंडळाच्या बांधकाम सेलमधील कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहात, सध्या एका उड्डाणपुलाच्या बांधकामाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुमच्या अधिपत्याखाली दोन कनिष्ठ अभियंते आहेत, जे रोजच्या बांधकामाचे निरीक्षण करतात व आपल्याला अहवाल देतात. आपण शेवटी मुख्य अभियंत्यांना अहवाल देता. बांधकाम जवळजवळ पूर्ण होत असताना, कनिष्ठ अभियंते नेहमी सांगतात की सर्व काम डिझाईननुसार सुरू आहे.