शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि नीतिमत्ता

शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि नीतिमत्ता

E sakal

Premium|study Room : शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार आणि नैतिकतेची परीक्षा

Teacher recruitment scam : शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार आणि नैतिकतेची परीक्षा, सीबीआय चौकशीतून उघड झालेले गैरप्रकार या सगळ्याविषयीची केस स्टडी वाचा, सकाळ स्टडी रूममधून.
Published on

A Case Study on Teacher Recruitment Scam and Ethical Failures

लेखक : अभिजित मोदे

निशांत, हा एक मेहनती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. त्याचे वडील हे राज्याचे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. पाच वर्षे सतत प्रयत्न करूनसुद्धा निशांतला यश मिळू शकले नाही.

आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने त्याच्या वडिलांनी शालेय सेवा आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मोठी लाच देऊन मुलासाठी शिक्षकाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला निशांत संकोचला, मात्र अखेरीस ध्येय साध्य करण्यासाठी वडिलांच्या योजनेला आपण होकार दिला.

निकाल जाहीर झाल्यावर निशांतला उत्तम यश मिळाले आणि नोकरी लागली, त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांमध्ये मोठा जल्लोष झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET), मुलाखत, व्यक्तिमत्व मूल्यांकन यांचा समावेश असलेल्या निवड प्रक्रियेत गैरव्यवहार उघडकीस आला. शालेय सेवा आयोगाने SLST पॅनेलच्या शिफारसीनुसार नियुक्तीपत्रे दिली, पण SLST पॅनेलवर नसलेल्या उमेदवारांनादेखील नियुक्तीपत्रे मिळाल्याचा संशय व्यक्त झाला.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या तपासात उमेदवारांचा रँक बदलणे, मुलांचा पॅनेल कालबाह्य झाल्यानंतर पत्रे देणे, यांसारख्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. यानंतर उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश दिले.

CBI ने शोधले की, रिक्त पदांची अनधिकृत तपासणी, चुकीच्या शिफारसी, उत्तरपत्रांमध्ये फेरफार झाले आहेत. SSC डेटाबेसशी OMR डेटा जुळविण्याचे निर्देश CBI ला मिळाले, कारण मूळ OMR पत्रके नष्ट झाली होती. उच्च न्यायालयाने सरकारच्या सुपरन्युमेररी पदांच्या (अतिरिक्त पदांच्या) निर्णयालाही अमान्य केले. आता हा भ्रष्टाचार प्रकरण उघड झाल्याने निशांतला गंभीर परिणामांचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com