
अहिंसा, संयम आणि रणनीती: युद्धाशिवाय विजयाची दिशा
E sakal
लेखक -श्रीकांत जाधव
सुन त्झूने म्हटले आहे की, युद्धकलेतील सर्वोच्च कलाकौशल्य कशाला म्हणायचं तर लढाई न करता शत्रूला पराभूत करता यायला हवं. गांधीजीसुध्दा शिकवतात की, खरी ताकद भीतीने नाही, तर आत्मविश्वास आणि संयमाने येते; म्हणूनच अहिंसा हे खरे शस्त्र आहे.
या दोन महत्त्वाच्या विचारांतून मिळणारा थोडक्यात बोध काय तर, युध्दच न होवू देता प्रश्न सोडवणे हा खरा विजय आहे. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या आणि व्यापारी समृद्धतेच्या काळात जगत आहोत.
या प्रगतशील जगात अण्वस्त्रांची भिती हा मोठा जागतिक प्रश्न बनला आहे. अशा काळात हा विचार केवळ नैतिक नाही तर व्यवहार्य देखील ठरतो.
मानवाला जर स्वत:चं अस्तित्व टिकवायचं असेल तर जगातील सर्व नेत्यांना सर्वमतभेद दूर ठेवून हा विचार स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शत्रूशी लढण्याचा सर्वोत्तम पर्याय शांततेचाच असतो याबाबत काही शंका राहत नाही.