
महेश शिंदे
वर्ष २०२५. साताऱ्याच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. या गावाच्या वेशीवर एक प्राचीन वटवृक्ष उभा होता. अनेक पिढ्यांना पाहिलेला, अनेक पावसाळे, उन्हाळे अनुभवलेला. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचा तो दिमाखदारपणा हरवू लागलेला. त्याची पानं ही वेळेआधीच सुकायला लागली होती, वाऱ्याची दिशा भरकटल्यासारखी झाली होती, पावसाचा तपासच नव्हता..