१. २०२३ हे वर्ष कोणत्या कारणामुळे ऐतिहासिक ठरले?(१) सर्वाधिक पावसाचे वर्ष म्हणून(२) सर्वाधिक बर्फवृष्टीचे वर्ष म्हणून(३) सर्वाधिक उष्णतेचे वर्ष म्हणून(४) सर्वाधिक वाऱ्याचे वर्ष म्हणून.२. International Solar Alliance (ISA) कोणत्या दोन देशांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली?(१) भारत आणि अमेरिका(२) भारत आणि फ्रान्स(३) भारत आणि चीन(४) भारत आणि जर्मनी.३. भारताने २०७० पर्यंत कोणते उद्दिष्ट गाठण्याची घोषणा केली आहे?(१) १००% सौरऊर्जेचा वापर(२) सर्व कारखाने बंद करणे(३) १०० GW वीज निर्मिती(४) नेट-झिरो कार्बन उत्सर्जन४. COP २६ (ग्लासगो) परिषदेत भारताने पंचामृत घोषणेत खालीलपैकी कोणते उद्दिष्ट घोषित केले?(१) २०३० पर्यंत ७५% ऊर्जा कोळशातून मिळवणे(२) ५०० GW गैर जीवाश्म इंधन क्षमतेची निर्मिती(३) १०० अब्ज टन कार्बन उत्सर्जन करणे(४) २०५० पर्यंत नेट-झिरो पातळी गाठणे.५. भारताच्या पंचामृत घोषणेनुसार २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेच्या कार्बन उत्सर्जन तीव्रतेत किती टक्क्यांची घट करायची आहे?(१) ३०%(२) ५०%(३) ४५%(४) २५%६. भारतीय संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार, उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात?(१) राष्ट्रपती(२) पंतप्रधान(३) लोकसभा अध्यक्ष(४) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश७. भारतातील उपराष्ट्रपतींची निवड कोणाच्या माध्यमातून होते?(१) थेट जनतेच्या मतदानातून(२) राज्य विधिमंडळाच्या सदस्यांद्वारे(३) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांद्वारे(४) संसद सदस्यांच्या मतदार मंडळाद्वारे.८. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी सादर करताना उमेदवाराला किती प्रस्तावक आणि समर्थनकर्ते आवश्यक असतात?(१) १० प्रस्तावक व १० समर्थनकर्ते(२) ५ प्रस्तावक व ५ समर्थनकर्ते(३) १५ प्रस्तावक व १५ समर्थनकर्ते(४) २० प्रस्तावक व २० समर्थनकर्ते९. जैन धर्मामध्ये खालीलपैकी कोणते तीन तत्त्व त्रिरत्न म्हणून ओळखले जातात?(१) अहिंसा, सत्य, तप(२) सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण(३) श्रद्धा, भक्ती, ध्यान(४) धर्म, अर्थ, मोक्ष१०. जैन धर्मानुसार मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेले सम्यक ज्ञान काय दर्शवते?(१) धार्मिक पुस्तके पाठांतर करणे(२) गुरूंची आज्ञा पाळणे(३) योग्य आणि खरे ज्ञान प्राप्त करणे(४) तपश्चर्या करणे.११. जैन धर्मातील त्रिरत्न संकल्पनेत सम्यक आचरण कशाशी संबंधित आहे?(१) ध्यानधारणा करण्याशी(२) योग्य आहार घेण्याशी(३) नैतिक, अहिंसक व संयमी जीवन जगण्याशी(४) व्रतांचे पाठांतर करण्याशी१२. यारलंग त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर चीन कोणते मोठे प्रकल्प राबवत आहे?(१) मोठा जलपर्यटन प्रकल्प(२) जगातील सर्वात मोठे हायड्रोइलेक्ट्रिक धरण(३) जलसिंचन प्रकल्प(४) सौरऊर्जा केंद्र.१३. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?(१) सरोजिनी नायडू(२) सुचेता कृपलानी(३) कस्तुरबा गांधी(४) अरुणा आसफ अली१४. भारत छोडो आंदोलनादरम्यान गोवालिया टँक मैदानात तिरंगा फडकवून कोणी नेतृत्व केलं?(१) सरोजिनी नायडू(२) कमला देवी चट्टोपाध्याय(३) अरुणा आसफ अली(४) उषा मेहता१५. धारासना मीठ सत्याग्रहामध्ये महिलांचे नेतृत्व कोणी केले होते आणि लढ्याचे राष्ट्रीय प्रतिनिधित्व कोणी केले?(१) सरोजिनी नायडू व कस्तुरबा गांधी(२) सरोजिनी नायडू व कमला देवी चट्टोपाध्याय(३) अरुणा आसफ अली व उषा मेहता(४) सुचेता कृपलानी व कमला नेहरू.१६. दिव्या देशमुख या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?(१) टेनिस(२) नेमबाजी(३) बुद्धिबळ(४) बॅडमिंटन१७. ‘फिडे वर्ल्ड वूमन्स चेस कप’ (२०२५) जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली?(१) हम्पी कोनेरू(२) वैशाली आर(३) दिव्या देशमुख(४) तनिया सचदेव१८. गांधीवादी कालखंडात (१९१५–१९४७) महिलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणता महत्त्वाचा बदल घडून आला?(१) स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला(२) स्त्रियांना सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग मिळाला(३) स्त्रियांना शासकीय नोकरीत आरक्षण मिळाले(४) स्त्रियांना शिक्षण बंद करण्यात आले१९. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत महिलांना सामावून घेतले कारण-(१) त्यांना लोकसंख्येची ताकद वाढवायची होती(२) महिला घरात बसलेल्या राहू नयेत अशी त्यांची इच्छा होती(३) त्यांनी महिलांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास ठेवला(४) महिलांना केवळ आर्थिक मदतीसाठी वापरायचे होते.२०. गांधीवादी चळवळीदरम्यान कोणत्या घटनेने महिलांचा स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभाग ठळकपणे समोर आला?(१) १९०५ चे वंगभंग आंदोलन(२) सायमन कमिशनविरोधी आंदोलन(३) १९३० चे मीठ सत्याग्रह(४) १८५७ चा उठाव२१. कार्तिक उरांव यांच्या सन्मानार्थ कोणत्या विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी करण्यात आली आहे?(१) आदिवासी शिक्षण विद्यापीठ(२) पंखराज विद्यापीठ(३) जनजाती संस्कृती विद्यापीठ(४) वनवासी संशोधन विद्यापीठया प्रश्नांची उत्तरं 'स्टडीरुम'च्या WhatsApp ग्रुप्सवर मिळतील.अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.