
भारत आणि बांगलादेशमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या जवळचे राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत, जे वारसा, भाषा आणि परस्पर सहकार्य याने एकमेकांशी जोडले गेले आहेत.
पण अलीकडच्या घडामोडींनी विशेषतः बांगलादेशमध्ये मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये बदल झाल्यानंतर एकेकाळी मजबूत असलेल्या या संबंधांवर, विशेषतः व्यापार आणि सीमा सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.