१. भारताने ५० टक्के वीज उत्पादन क्षमता कोणत्या प्रकारच्या इंधनातून प्राप्त केली आहे?१. जीवाश्म इंधन२. नैसर्गिक वायू आणि कोळसा३. जैवइंधन आणि डिझेल४. गैर-जीवाश्म इंधन.२. भारताने कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचा संकल्प केला आहे?१. २०३०२. २०४०३. २०५०४. २०६०३. खालीलपैकी कोणती योजना शेतकऱ्यांना सौर पंप पुरवठा करून वीज व सिंचन सुविधा देण्याचा उद्देश ठेवते?१. राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन२. PM सूर्य घर योजना३. PM-कुसुम योजना४. राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान.Premium|Study Room : इंग्रजांनी भारतात पाय कसे रोवले?.४. PM सूर्य घर ''मोफत वीज योजना'' चा मुख्य उद्देश काय आहे?१. शेतकऱ्यांना अनुदानित सौर पंप देणे२. सौर ऊर्जेवर आधारित वाहने तयार करणे३. घरांमध्ये मोफत एलईडी बल्ब वितरित करणे४. घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवून नागरिकांना ऊर्जा उत्पादक बनवणे५. खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान ऊर्जा वितरण अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ बनवण्यासाठी वापरले जात आहे?१. स्मार्ट ग्रीड२. सोलर कुकर३. थर्मल प्लांट४. चारकोल युनिट.६. खालीलपैकी कोणते इंधन प्रकार जीवाश्म इंधनात मोडतात?१. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा२. कोळसा, भूगर्भातील तेल, नैसर्गिक वायू३. अणुऊर्जा, सौर ऊर्जा, वायू४. जलविद्युत, जैवऊर्जा७. गैर-जीवाश्म इंधन वापरण्याचा मुख्य पर्यावरणीय फायदा कोणता आहे?१. ऊर्जा स्वयंपूर्णता कमी होते२. हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते३. जागतिक तापमानवाढ वेगाने होते४. हरितगृह वायूंचे उत्सर्जन अत्यल्प होते८. खालीलपैकी कोणते इंधन शाश्वत व नवीकरणीय किंवा अक्षय स्वरूपाचे आहे?१. पवन ऊर्जा२. नैसर्गिक वायू३. भूगर्भातील तेल४. कोळसा.९. 'नाऊकास्ट' (Nowcast) तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी केला जातो?१. दीर्घकालीन हवामान अंदाज देण्यासाठी२. तात्काळ हवामान बदलांचा इशारा देण्यासाठी३. कृषी उत्पादन मोजण्यासाठी४. सौर पॅनलची कार्यक्षमता तपासण्यासाठी१०. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४५ ते ३५१ यांचा मुख्य उद्देश काय आहे?१. केवळ हिंदी भाषा प्रोत्साहन देणे२. सर्व शिक्षण इंग्रजीतून करणे३. राज्यभाषा व अल्पसंख्याक भाषांचा सन्मान राखणे४. एकच राष्ट्रभाषा लागू करणे११. इंटरनॅशनल सोलार अलायन्स (ISA) या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा प्रमुख हेतू काय आहे?१. पारंपरिक इंधनांचा वापर वाढवणे२. सौरऊर्जेचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करणे३. अणुऊर्जा संशोधनास मदत करणे४. जीवाश्म इंधन साठवणे आणि वितरित करणे१२. ‘जागतिक दक्षिण’ (Global South) या संकल्पनेचा उपयोग मुख्यतः कोणत्या अर्थाने केला जातो?१. केवळ भौगोलिक स्थानासाठी२. राजकीय स्थैर्यासाठी३. आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने४. हवामान अंदाजासाठी.Premium |Study Room : ढगफुटी : हवामानाचा प्रकोप .१३. भारत ग्लोबल साउथचे नेतृत्व कसे करत आहे?१. मैत्री, सहकार्य आणि नैतिकतेवर आधारित भूमिका घेऊन२. सामरिक करार करून३. फक्त आर्थिक कर्ज देऊन४. औद्योगिक स्पर्धेत वर्चस्व राखून१४. गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पू. ५६३ च्या सुमारास कोणत्या ठिकाणी झाला?१. बोधगया२. लुंबिनी३. सारनाथ४. कुशीनगर१५. गौतम बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या चार आर्यसत्यांमध्ये ''निरोध'' या तत्त्वाचा अर्थ कोणत्या संकल्पनेशी सर्वाधिक सुसंगत आहे?१. आत्मत्याग करून मोक्ष प्राप्त करणे२. तृष्णेच्या पूर्ण नाशामुळे दुःखातून मुक्ती मिळणे३. ब्रह्मचर्याचे पालन करून ज्ञानप्राप्ती करणे४. कर्मसिद्धांतावर आधारित पुनर्जन्म टाळणे१६. गौतम बुद्धांनी सुचविलेल्या अष्टांगिक मार्गामध्ये कोणत्या घटकांचा समावेश नाही?१. सम्यक ध्यान२. सम्यक वाणी३. सम्यक स्मृती४. सम्यक आजीविका.१७. भारतामध्ये CPI तयार करण्याचे कार्य कोणत्या संस्थेकडे आहे?१. RBI२. NITI Aayog३. NSO (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय)४. वित्त मंत्रालय१८. बौद्ध धर्मानुसार जीवनातील दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्या तत्त्वज्ञानावर आधारित मार्गाचा अवलंब करावा लागतो?१. पंचशील मार्ग२. अष्टांगिक मार्ग३. कर्मयोग मार्ग४. भक्ती मार्ग१९. CPI तयार करताना खालीलपैकी कोणता गट समाविष्ट नाही?१. अन्नधान्य२. शिक्षण३. शेअर बाजार निर्देशांक४. आरोग्य सेवा२०. CPI चे आधार वर्ष वेळोवेळी का बदलले जाते?१. लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी२. कर प्रणालीत बदल झाल्यामुळे३. चलन नोटांची छपाई थांबवण्यासाठी४. खरेदी सवयी बदलत असल्यामुळे.२१. उत्तर प्रदेश सरकारचा ''एक जिल्हा एक नदी'' हा उपक्रम कोणत्या उद्देशासाठी राबवला जात आहे?१. नवीन नदी प्रकल्प उभारण्यासाठी२. जिल्हानिहाय पाटबंधारे योजनेसाठी३. नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी४. जल पर्यटन वाढवण्यासाठी अधिक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या खास टिप्ससाठी सकाळ स्टडी रूम जरूर वाचा. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.