
Historic India–UK Free Trade Agreement 2025: Boosting Trade, Jobs & Investments
लेखक - सचिन शिंदे
एक ऐतिहासिक करार : नव्या युगाची सुरुवात
२४ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन भेटीत भारत आणि ब्रिटन दरम्यान एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) झाला. “कंप्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अॅग्रीमेंट” (CETA) असं या कराराचं अधिकृत नाव आहे. जानेवारी २०२२ पासून या करारावर चर्चा सुरू होती. हा भारताचा पहिलाच असा व्यापारी करार आहे जो युरोपमधील मोठ्या अर्थव्यवस्थेशी करण्यात आला आहे. या करारामुळे २०४० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार २५ अब्ज पौंडांनी (सुमारे ₹२.६ लाख कोटी) वाढू शकतो आणि भारतात १ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.