
विपुल वाघमोडे, sakal Study Room
उत्पत्ती आणि इतिहासाचा मागोवा - मथुरा शिल्पकलेचा उगम इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात झाला. मात्र ही कला आपल्या पूर्ण विकसित रूपात कुषाण काळात (इ.स. १ ते ३ रे शतक) आणि त्यानंतर गुप्त काळात (इ.स. ४ ते ६ वे शतक) उत्कर्षाला पोहोचली.
मथुरा हे त्या काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. येथील स्थानिक लोककलेच्या पायावरच या शिल्पशैलीचा विकास झाला. मथुरा शैली पूर्णपणे स्वदेशी असून तिच्यावर कोणत्याही परकीय शैलीचा प्रभाव दिसत नाही.