

tolerance
E sakal
लेखक : अभिजित मोदे
सहिष्णुता म्हणजे केवळ इतरांचे विचार सहन करणे नव्हे, तर त्यांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती विकसित करणे. मानव म्हणून आपली मतं नेहमीच योग्य असतील असे नाही, त्यामुळे इतरांचा दृष्टिकोन मान्य करणे आवश्यक आहे.
जेव्हा आपण कोणाच्या मताशी सहमत नसतो, तरीही त्या व्यक्तीचा आदर राखतो, तेव्हा खऱ्या अर्थाने सहिष्णुतेचा विकास होतो. उदाहरणार्थ, घरात पालक आणि तरुण मुलांमध्ये पिढ्यांतील फरकांमुळे विचारभेद होतात. पण जर दोघांनीही एकमेकांच्या मतांचा आदर केला, तर घरातील वातावरण शांत राहते.