
यूपीएससीच्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. यातून शेवटी हजार-बाराशे अधिकाऱ्यांची निवड होते. यावरून या परीक्षेच्या काठिण्य पातळीचा अंदाज येऊ शकतो. मराठी टक्का वाढावा यासाठी शासकीय पातळीवरही बरेच प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षेची पद्धती, अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी करण्याचे तंत्र, याबाबतचे गैरसमज यांविषयी जाणून घेणे, महत्त्वाचे आहे. त्यातही ही परीक्षा देताना भाषेचं महत्त्वही कितपत आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे.