

The Real Power Lies Not in Weapons, But in Stories
E sakal
Soft Power Revolution: Winning Without Firing a Shot
लेखक - श्रीकांत जाधव
प्रस्तावना
आज जगाकडे पाहताना असे वाटू शकते की, लष्करी शक्ती आणि शस्त्रास्त्रेच राष्ट्राची ताकद ठरवतात. कारण अजूनही जगभरातील देश संरक्षणावर अब्जावधी डॉलर्स खर्च करतात. पण जर आपण बारकाईने याचा अभ्यास केला तर समजेल की, खरी सत्ता शस्त्रात नाही, तर कथानकात आहे.
म्हणजे लोकांच्या मनात पेरली जाणारी गोष्ट, विचार, भावना आणि विश्वास यांच्यात. ज्याच्या हातात कथा असते, त्याच्याकडे विचारांवर आणि समाजाच्या दिशेवर नियंत्रण असते. शस्त्रांनी आपण लोकांना घाबरवू शकतो, पण कथांनी लोकांना विश्वास देऊ शकतो. जो लोकांना प्रेरित करतो, जोडतो आणि त्यांना एका विचारासाठी लढण्यास प्रवृत्त करतो.