
लेखक : अमोघ वैद्य
वाराणसीच्या उत्तरेस अवघ्या नऊ किलोमीटरवर, गाझीपूर मार्गालगत वसलेले सारनाथ हे भारताच्या प्राचीन बौद्ध वारशाचे तेजस्वी द्योतक. प्राचीन ग्रंथांत याचा उल्लेख ऋषिपत्तन आणि मृगदाव अशा नावांनी आढळतो. निसर्गरम्य परिसर, पौराणिक आख्यायिका आणि इतिहासाचे साक्षीदार असलेले अवशेष यामुळे हे ठिकाण जणू भूतकाळाची जिवंत प्रतिमा वाटते.