
जागतिक राजकारण आणि अर्थकारण हे नेहमीच एका नाण्याच्या दोन बाजू असतात. याच गुंतागुंतीच्या खेळात आता अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण आहे भारताची रशियाकडून तेल खरेदी. पण हा विषय इतका साधा नाही. यामागे आहे जागतिक राजकारण, ऊर्जा सुरक्षेची गणितं आणि देशहितासाठी घेतले जाणारे निर्णय.