
Himalayan Flood Threat: How Glacier Lakes Endanger Villages
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धरली गावात अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत आतापर्यंत ५ लोकांचा बळी गेला असून, १५ हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सुरुवातीला ही घटना ढगफुटीमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता वैज्ञानिक आणि हवामान तज्ज्ञांनी यामागे ग्लेशियर लेक आउटबर्स्ट (GLOF) हे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे हिमालयीन प्रदेशात दिवसेंदिवस वाढत जाणारा पुराचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.