

शहरी विकासाची किंमत
ई सकाळ
लेखक : निखिल वांधे
प्रश्न १ : जलसाठ्यांचे नागरी भू-उपयोगात रूपांतर केल्याने होणारे पर्यावरणीय परिणाम उदाहरणांसह स्पष्ट करा.
बंगळूरु शहराने २०२४ मध्ये अनुभवलेली तीव्र पाणीटंचाई आणि दिल्ली-एनसीआर (२०२३) व चेन्नई (२०२३) सारख्या महानगरांमध्ये वारंवार येणारे विनाशकारी शहरी पूर, ही नैसर्गिक जलसाठे बुजवून त्याजागी काँक्रिटची जंगले उभारण्याच्या गंभीर पर्यावरणीय परिणामांना अधोरेखित करतात. विकासाच्या नावाखाली होणारा हा बदल शहरांचे नैसर्गिक संतुलन बिघडवून त्यांच्या अस्तित्वासाठीच धोका निर्माण करत आहे.