Premium|Study Room: अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्कवाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम

H-1B Visa Fee Hike : भारतातील आयटी उद्योगासाठी एच वन बी व्हिसा अत्यंत महत्त्वाचा आहे. ट्रम्पनी त्यावरच घाव घातल्यावर या उदयोगाची आणि कर्मचाऱ्यांची पुढील वाटचाल कशी असेल?
H-1B Visa Fee Hike 2025 | अमेरिकेच्या व्हिसा शुल्कवाढीचा भारतीय IT आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम

H-1B Visa Fee Hike 2025 | अमेरिकेच्या व्हिसा शुल्कवाढीचा भारतीय IT आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम

E sakal

Updated on

श्रीकांत जाधव

प्रस्तावना

अमेरिकेचा H-1B व्हिसा कार्यक्रम १९९० मध्ये लागू झाला असून, या अंतर्गत तांत्रिक, अभियांत्रिकी, आरोग्यविषयक कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना अमेरिकेत नोकरीसाठी जाता येते. दरवर्षी ६५,००० व्हिसा मंजूर केले जातात, तसेच उच्च शिक्षितांसाठी २०,००० राखीव जागा असतात. यामध्ये भारताचा सुमारे ७० टक्के वाटा असून, हा कार्यक्रम भारताच्या आयटी उद्योगाचा महत्वाचा आधारस्तंभ आहे.

पण, १९ सप्टेंबर २०२५ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी $१००,००० इतके नवीन शुल्क लागू करणारा आदेश जारी केला, जो २१ सप्टेंबरपासून लागू झाला. याअगोदर हे शुल्क केवळ $१,४६० ते $४,५०० दरम्यान होते. हे नव्याने जाहीर केलेले शुल्क नवीन अर्जांसाठी लागू होणार आहे. आधीच्या व्हिसाधारक किंवा व्हिसा नूतनीकरणासाठी ते लागू नाही. तरीही, या एका बदलाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. या एका बदलामुळे प्रत्येक महिन्याकाठी सुमारे ५,५०० अर्ज कमी होण्याचा अंदाज आहे. भारताच्या एकूण जीडीपीमध्ये ८% वाटा असलेल्या आणि ५० लाखांहून अधिक नोकरी देणाऱ्या आयटी क्षेत्रावर अमेरिकेच्या या एका निर्णयाचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com