स्वित्झर्लंडला जाताय मग या गोष्टी ठेवा लक्षात!

धनाजी सुर्वे
Monday, 8 March 2021

स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक साॅकेट म्हणजेच युनिवर्सल ट्रॅव्हल अडाप्टर सोबत ठेवणे गरजेचे असते. कारण तेथे चार्जिंग पाॅईंट वेगळे असतात आणि लक्षात ठेवा   स्वित्झर्लंडमध्ये काहीही खरेदी करू नका. तेथे महागाई खूप आहे

कोल्हापूर : युरोपमधील सवर्वात सुंदर देश म्हणजे  स्वित्झर्लंड आहे. येथील चाॅकलेट, चीज, सुंदर अशा वस्त्या आणि एखाद्या पेंटिंगसारखे मनमोहक शरह तुम्हाला नक्कीच भूरळ घातल्याशिवाय राहणार नाही.  स्वित्झर्लंडला फिरायला जाणे हे अनेकांचे जणू दिवा स्वप्नच असते. परंतु, काहीवेळी आर्थिक बजेट, व्हिसा किंवा काही इतर बाबींमुळे हे स्वप्न स्वप्नच राहते.  स्वित्झर्लंड जेवढे सुंदर आहे तेवढेत ते महाग देखील आहे. 
 युरोपला जणाऱ्या भारतीयांसानी काही गोष्टी लक्षात घेतल्या तर  स्वित्झर्लंडची सफर मस्त होईल यात काही शंका नाही. 
 
व्हिसा घेण्याआधी

स्वित्झर्लंडमध्ये व्हिसा फ्रि ट्रॅव्हल नसतात. त्यासाठी तुम्हाला प्रथम व्हिसा करावा लागेल. तोही कमीत कमी तीन महिने आधी. त्यासाठी  Schengen visa चा अर्ज करावा लागेल. नाॅर्मल व्हिसा अप्लाय करता येत नाही. 
 
इलेक्ट्रिक सॉकेट सोबत ठेवा

स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक साॅकेट म्हणजेच युनिवर्सल ट्रॅव्हल अडाप्टर सोबत ठेवणे गरजेचे असते. कारण तेथे चार्जिंग पाॅईंट वेगळे असतात आणि लक्षात ठेवा   स्वित्झर्लंडमध्ये काहीही खरेदी करू नका. तेथे महागाई खूप आहे. 
 
लोकांसोबत बोलताना या गोष्टी लक्षात ठेवा

भारतीय लोक खूप बोलके असताता असे म्हटले जाते. आपण कोठेही गेलो तरी बडबड चालूच असते. मग कॅशिअर, बस कंडाक्टरसोबत आपण गप्पा मारत असतो. परंतु,   स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला असे करता येत नाही. येथील लोक फक्त कामाशी काम ठेवतात. जर त्यातूनही तुम्ही विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समन्स दिला जाईल. 
 
भाषा महत्वाची

स्वित्झर्लंडमध्ये इंग्रजी भाषेचा जास्त वापर होत नाही. तेथे इटालियन, फेंच, जर्मन भाषा बोलणारे लोक भेटतील. योसोबतच तेथे रोमांश भाषा जास्त बोलली जाते. त्यामुळे तेथे जाताना प्रथम कनवर्टर अॅप किंवा एक भाषेचे चांगले पुस्तक सोबत ठेवा. 
 
रेल्वेचा प्रवास नक्की करा

स्वित्झर्लंडला गेल्यानंतर जगातील सर्वात सुंदर लेल्वे लाईनवरून प्रवास करण्यास विसरू नका. हा एक वेगळाच अनुभव आहे. शक्य असल्यास याचे बुकिंग आधीच करा, कारण ही तिकीटे कायम फुल असतात.  

फ्रि पब्लिक ट्रानस्पोर्टचा वापर करा

विदेशात फिरायला गेल्यानंतर येथील प्रवासाबाबतच्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. कारण   स्वित्झर्लंडमधील बर्न, लॉसेर्न, बेसिल, जिनीवा या शरहार प्रवास फ्रि आहे. तर एंजिलबर्गमध्ये प्रवास खूप महाग आहे. अशा शहरात फ्रि सायकर घेऊ शकता. हाॅटेल बुक करतानाच तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. हाॅटेलमध्येच तुम्हाला प्रवासाचे तिकिट मिळेल. 
 
कोणताही प्रवास पास खरेदी करू नका

प्रसाशी पास खूप चांगला पर्याय आहे, परंतु, तुम्ही पब्लिक प्रवास करणार असाल तर. परंतु, प्रत्येकवेळी हे करू नका. कारण येथील अनेक शैसेहरांत प्रवास फ्रि आहे. मग उगीच पैसे खर्च करू नका. 
 
ट्रव्हल्स बुक करताना लक्ष द्या

स्वित्झर्लंडमध्ये सर्वच गोष्टी सुंदर आहेत. परंतु, येथे सर्व काही कमर्शियलसुद्धा आहे. माऊंट टिटलिसला जाणार असाल तर त्यासाठी ट्रव्हल्स बुक करावी लागत नाही. तुम्हाला ती फ्रिमध्ये मिळेल. 
 
हाॅटेलची निवड करताना सावध राहा

हाॅटेलचे बुकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. जसे की, तुम्हाला स्विज बार्न म्हणजेच अस्तबल मध्येही राहता येते. शिवाय फार्महाऊसवर राहण्याची सुविधा कमी पैशात मिळेल. याबरोबरच हा एक अनुभवही असेल. Swiss holiday farms असे गुगलमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतील. 

छोट्या दुकानात खरेदी करा

स्वित्झर्लंडमध्ये चीझ आणि चाॅकलेट खूप मिळतात. परंतु, याची खरेदी करताना टूरिस्ट ग्राॅसरीतून खरेदी करू नका. कारण ते खूप महाग पडेल. त्यापेक्षा स्थानिक दुकाने किंवा छोट्या दुकानात याची खरेदी करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news Going to Switzerland then keep these things in mind