दक्षीण भारतात हे आहेत प्रसिध्द शिवालय; जेथे शिवभक्तांची राहते गर्दी

दक्षीण भारतात हे आहेत प्रसिध्द शिवालय; जेथे शिवभक्तांची राहते गर्दी

जळगाव ः  महाशिवरात्र अत्यंत पवित्र असा दिवस असून या दिवशी शिवभक्तांच्या गर्दीने शिव मंदिरा ओसंडून वाहत असतात. उत्तर भारतात अशी अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत जिथे लाखो भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी

प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर केवळ उत्तर-भारतातच अस्तित्वात आहे. परंतू  अशी काही शिव मंदिरे दक्षिण भारतात देखील अस्तित्त्वात असून त्यांना एक इतिहास लाभलेला आहे.  या अत्यंत पवित्र आणि प्राचीन मंदिरात महाशिवरात्रीला लाखो भाविकांची भगवना शंकराच्या दर्शनाला येत असतात, चला तर जाणून घेवू अशी कोणती मंदिर आहेत...

श्री कोटलिंगेश्वर स्वामी मंदिर

कर्नाटकातील जगातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक म्हणजे श्री कोटलिंगेश्वर स्वामी मंदिर. असे म्हणतात की या मंदिरातील शिवलिंग सुमारे 33 मीटर लांबीचे आहे. या मंदिराच्या आवारात सुमारे 1 कोटी शिवलिंग स्थापित आहे. येथे महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भगवान शिव यांच्या लग्नाचे आयोजन देखील केले जाते. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात हे मंदिर कोटिलिंगेश्वर धाम म्हणूनही ओळखले जाते.   

श्री वादाक्कुन्नाथन मंदिर

केरळमधील सर्वात लोकप्रिय शिवमंदिरांपैकी एक म्हणजे श्री वादाक्कुन्नाथन मंदिर. केरळमधील त्रिशुर शहरात असलेल्या या मंदिराबद्दल असे म्हणतात की हे मंदिर भगवान परशुरामांनी बनवले होते. या मंदिराभोवती दगडी भिंत आहे. बरेच लोक हे मंदिर 'टेंकैलशम' या नावाने देखील ओळखतात. येथे अहोरात्र तूपाचे येथे दिवे लावले जातात आणि तेच तूप भक्तांना प्रसाद स्वरूपात दिले जाते.

मल्लिकार्जुन स्वामी मंदिर

आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी मल्लिकार्जुन स्वामी मंदिर आहे.  हे मंदिर श्रीशैलम नावाच्या पर्वतावर आहे. बरेच लोक या मंदिरास दक्षिणेचे कैलास देखील म्हणतात. या मंदिराबाबत अशी अख्यांकिका आहे की, महाभारतनुसार श्रीशैलम पर्वतावर भगवान शिवची पूजा केल्यास अश्वमेध यज्ञ करण्याचे फळ मिळाले होते. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर भारताच्या 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भक्त लोक या मंदिरात मल्लिकार्जुन ते शिव आणि भद्रकाली ते देवी पार्वती या रूपाने पूजा करतात. महा शिवरात्रीला मोठी गर्दी या ठिकाणी असते. 

अरुलमीगु रामानाथस्वामी मंदिर

तामिळनाडूतील रामेश्वरम शहर दक्षिण-भारतात एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे लहान-मोठी तसेच पवित्र मंदिरे आहेत.  अरुलमीगु रामानाथस्वामी मंदिर हे दक्षिण मधील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. हिंदूंच्या चार धाममध्येही या मंदिराचा समावेश आहे. रावणाची हत्या केल्यावर भगवान रामने येथे पूजा केली असे म्हतले जाते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com