पुरीच्या जगन्नाथ मंदिराची रहस्ये निसर्गालाही देतात आव्हान

puri jagannath temple
puri jagannath temple

पुरी - भगवान जगन्नाथाची रथयात्रा कोरोनामुळे काही अटी आणि शर्थींच्या आधारावर काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार भक्तांच्या अनुपस्थितीतच रथयात्रा काढण्यात आली. भगवान कृष्णाचं हे मंदिर असून या मंदिरात विज्ञानाला आव्हान देणाऱ्या काही गोष्टी आहेत. ओडिसातील पुरी इथं असलेल्या या वैष्णव मंदिराच्या शिखरावरील ध्वजाचंही एक कोडंच आहे. हा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो. मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो आणि तो बदलण्यासाठी वर चढणारी व्यक्तीही विरुद्ध दिशेने जाते. 

अष्टधातूंचं सुदर्शन चक्र
मंदिराच्या शिखरावर असलेलं सुदर्शन चक्रही एक रहस्य आहे. अष्टधातूंपासून तयार झालेल्या सुदर्शन चक्राला नील चक्र असंही म्हटलं जातं. कोणत्याही कोपऱ्यातून ते पाहिलं असता ते सरळच दिसतं. याचं दर्शन घेणंही शुभ मानलं जातं. 

मोठं स्वयंपाक घर
जगन्नाथ मंदिरातील स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघरांपैकी एक आहे. यामध्ये एकावेळी जवळपास 500 आचारी आणि 300 सहकारी प्रसाद तयार करतात. मंदिरात दोन स्वयंपाक घरं आहेत.

एकावर एक सात भांड्यात शिजतो प्रसाद
प्रसाद तयार करण्यासाठी एकावर एक अशी सात भांडी ठेवली जातात. तसंच हा प्रसाद मातीच्या भांड्यात आणि लाकडाचा वापर करून केला जातो. विशेष म्हणजे सात भांड्यात सर्वात वरती ठेवलेल्या भांड्यातील अन्न शिजतं. 

लाटांचा आवाज होतो बंद
समुद्र किनाऱ्यावरच्या लाटांचा आवाज मंदिरात आजिबात ऐकू येत नाही. मंदिराच्या सिंहद्वारातून एक पाऊल आत टाकताच लाटांचा आवाज कानावर पडणं बंद होतं. सायंकाळच्या सुमारास हे स्पष्टपणे जाणवतं. 

मंदिरावरून जात नाहीत पक्षी
जगन्नाथ मंदीराची आणखी एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या कळसावरून कधी कोणता पक्षी उडत गेल्याचं किंवा बसल्याचं पाहिलेलं नाही असा दावा केला जातो. 

कळसाची सावली 
मंदिराच्या वास्तुरचनेमुळं निसर्गालाही आव्हान देणाऱ्या घटना इथं घडतात. जगात कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडला तरी त्याची सावली ही पडतेच मात्र जगन्नाथ मंदिराचा वरचा भाग याला अपवाद आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळेत याची सावली पडत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com