जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या 'तवांग मठा'वर चीनचा कब्जा; जाणून घ्या 1680 च्या दशकातली सर्वात रंजक कहाणी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : अरुणाचल प्रदेश! या राज्याचं नाव जरी ऐकलंतरी मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लीत झाल्यासारखं वाटतं, कारण हे राज्य मुळात आहेच खास.. येथील उंच-उंच डोंगर कडे, अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण आणि इथले खास मठ! अरुणाचलमधील अशी ठिकाणं, जी ईशान्येकडील राज्यांमध्ये समाविष्ट आहेत, जिथे दरवर्षी लाखो पर्यटक भेटीसाठी येतात. हे राज्य चीनपासून काहीच अंतरावर असल्याने भारतासाठी हे राज्य खूप महत्वाचे मानले जाते. येथे अस्तित्त्वात असलेल्या इमारती, वाडे आणि बौद्ध मठ जगभर प्रसिद्ध आहेत. या मठांमध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकाचे 'तवांग मठ' आहे, ज्यास तवांग मोनेस्ट्री म्हणूनही ओळखले जाते.

आपल्या आयुष्यात कधी अरुणाचल प्रदेश फिरण्याचा योग्य येईल, तेव्हा आपल्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतील. कारण, येथील निसर्ग संपदा आणि धार्मिक परंपरा हे त्याचेच द्योतक आहे. येथील तवांग मठ कधी आणि का बांधला असेल?, उंच पर्वतावर तवांग मठ बांधण्यामागचे ध्येय काय असू शकते? अशी बरीच प्रश्न आपल्या मनात घोळत राहतील. पण, आम्ही तुम्हाला घरबसल्या या सुखद क्षणांचा लेखाव्दारे आनंद देणार आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात तवांग मठाविषयी काही रोचक तथ्ये..

1962 मध्ये तवांग मठावर चीनचा कब्जा

जगातील दुसरे सर्वात मोठे 'तवांग मठ' मेराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी 1680 च्या दशकात बनवले होते. तेव्हापासून या मठात आजअखेर मसय बौद्ध धर्माशी संबंधित पाचशेहून अधिक बौद्ध भिक्षू येथे राहतात, तर हजारो लोक अद्याप समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंचीवर असलेल्या या मठात भेट देताना दिसतात. 1962 मध्ये चीनने काही महिने हा मठ ताब्यात घेतला होता. मात्र, चीनला येथून माघार घ्यावी लागली. या मठाची खासियत अशी की, हा मठ तवांग नदीच्या काठी असल्याने, भारत आणि चीनसाठी हे स्थान मोक्याचे मानले जाते.

घोडे ज्या डोंगरावर पोहोचले, तिथेच झाली मठाची निर्मिती

हा मठ बांधण्यामागची कहाणीही तितकीच रंजक आहे. पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की मरद लामा लोद्रे ग्यात्सो याचा घोडा चरत असताना एका ठिकाणी हरवला गेला. त्याचा शोध घेतला असता, तो कुठेच सापडला नाही. परत काही दिवसांनी शोध मोहीम सुरु केली असता, ग्यात्सो यांचा घोडा एका डोंगरावर पहायला मिळाला. त्याने घोडा गेलेल्या 'त्या' ठिकाणाला आशीर्वादाचे संकेत मानून स्वीकारले आणि या ठिकाणी मठ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले. तद्नंतर स्थानिक लोकांच्या मदतीने येथे मठ बांधला गेला. त्याचप्रमाणे, आणखी एक आख्यायिका आहे, जी घोड्याशीच प्रेरित आहे, जिला ल्हासाच्या राजपुत्रेशी संबंध मानले जाते.

तवांग मठाची रचना

सुरुवातीला हे मठ लहान माकन म्हणून बांधले गेले. काही वर्षांनंतर त्याचे रूपांतर भव्य झोपडीच्या रूपात झाले. इथल्या प्रत्येक भिंतीवर दिव्य आणि संतांची चित्रे रेखाटली आहेत. हा मठ तीन मजली इमारतीच्या स्वरूपात असून त्यामध्ये एक भव्य लायब्ररी देखील अस्तित्वात आहे. इथल्या प्रत्येक मजल्यावरील भिंती ह्या बौद्ध चिन्हे दर्शविणारी बनविल्या आहेत. या मठात बुद्धांची 18 फुटांची मूर्ती देखील स्थापित आहे.

अरुणाचल प्रदेशमधील 'या' ठिकाणांना देखील भेट द्या..

अरुणाचल प्रदेशमधील 'तवांग मठ' सोडून, ​​बरीच चांगली ठिकाणे आहेत.. जिथे आपण फिरायला जाऊ शकता. नूरानांग फॉल्स, गोरीचेन पीक आणि तवांग वॉर मेमोरियल यासारख्या ठिकाणी देखील भेट दिली जाऊ शकते. येथे आपण सकाळी सात ते संध्याकाळी सातच्या दरम्यान कधीही फिरायला जाऊ शकता. इथला मार्च ते सप्टेंबर हा काळ तवांग मठात जाण्यासाठी सर्वात योग्य मानला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com