esakal | स्वच्छ, सुंदर अशा ऐतिहासिक इंदूर शहरात फिरायचयं; हे आहेत महत्वाचे ठिकाणे

बोलून बातमी शोधा

स्वच्छ, सुंदर अशा ऐतिहासिक इंदूर शहरात फिरायचयं;  हे आहेत महत्वाचे ठिकाणे   }

भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख निर्माण झाली आहे.

स्वच्छ, सुंदर अशा ऐतिहासिक इंदूर शहरात फिरायचयं; हे आहेत महत्वाचे ठिकाणे
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः मध्यप्रदेशातील इंदूर हे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला तर आहेच ते एक समृद्ध शहर म्हणून त्याची ओळख आहे. त्याच सोबत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे इंदूर शहरात फिरायला आले असाल तर या शहरातील ऐतिहासिक इमारती, धार्मिक स्थळ आणि तलाव पाहण्यास विसरू नका. 

इंदूरमधील बहुतेक पर्यटन स्थळे एकोणिसाव्या शतकातील आहे असून चला जाणून घेवू इंदूर मधील काही प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांबद्दल...

राजवाडा महाल

इंदूरची बहुतेक पर्यटन स्थळे हे एकोणिसाव्या शतकातील आहे. त्यात 'राजवाडा महाल' ला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. ही सात मजली इमारत इंदूर शहरातील सर्वात प्रसिद्ध राजवाडा आहे. हा वाडा दोनशे वर्षांपूर्वी होळकर घराण्याने बांधला होता. वाड्यात एक सुंदर बाग, एक कृत्रिम धबधबा आणि काही सुंदर कारंजे आहेत. 

पाटलापाणी धबधबा

इंदूरमध्ये स्थळानंतर  शहरालगत एक पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण म्हणजे पाटलापाणी धबधबा हा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा इंदूरचा सर्वात निसर्गरम्य ठिकाण असून येथील हिरवळ आणि वळणारी टेकड्या तुम्हाला प्रेश करून टाकतील. 
 

रालामंडल अभयारण्य

ऐतिहासिक वाडा, धबधबा पाहिल्यानंतर इंदूरमधील आणखी एक प्रमुख ठिकाण 'रालामंडल वन्यजीव अभयारण्य' आहे. भारताच्या सर्वात प्राचीन अभयारण्य आहे. या अभयारण्यात हरिण, वाघ आणि हजारो पक्षी आपल्याला दिसणार. आपण पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमी असल्यास, हे स्थान आपल्यासाठी नंदनवनापेक्षा कमी नाही. 

बुलियन मार्केट

पर्यटन, धार्मिक स्थळांसोबत इंदूरमध्ये सराफ बाजार देखील प्रसिध्द आहे. येथे स्वस्त किंमतीत दागदागिने खरेदी करू शकता. दागिन्यांसोबतच, हा बाजार विविध मिठाईसाठी देखील प्रसिध्द आहे. येथे वेगवेळे प्रकारचे डिशेशचा आपण आनंद घेवू शकतात.