चंद्रावरील अनुभूती घ्यायची! तर जाणून घ्या भारतातील मूनलँडविषयी

टीम ई सकाळ
Monday, 15 February 2021

हे स्थळ भारतातील काश्मीरमध्ये आहे. ते लेहपासून केवळ 127 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाचे नाव लामायुरु असे आहे. जगभरातून लोक या लामायुरु गाव फिरण्यासाठी येतात. विशेषतः मूनलँडसाठी जरुर येतात.

नवी दिल्ली : आधुनिक काळात लोक चंद्रावर आपले घर बनवण्यासाठी प्रयत्न करित आहेत. यासाठी काहींनी चंद्रावर जमीनही खरेदी केली आहे. तसे अंतराळात जमीन खरेदी करणे आणि विकणे बेकायदेशीर आहे. यासाठी वर्ष 1967 मध्ये एक कायदा बनवण्यात आला होता. ज्यात चंद्र आणि ग्रहांवर जमीन खरेदी आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. या करारावर भारतासह 104 देशांनी स्वाक्षऱ्या करुन सहमती दर्शवली होती. सध्याच्या स्थितीत चंद्रावर घर बांधणे खूप कठीण आहे. अशा स्थितीत लोक चंद्रावरील जमीन केवळ आपल्या नावावर करु शकतात. जसे की चंद्रावर फिरण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी निराश होण्याची काही गरज नाही. कारण भारतात एक असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही चंद्राची सैर करु शकता. या ठिकाणाला मूनलँड अशा नावाने पूर्ण जगभरात ओळखले जाते. जर तुम्हाला भटकंतीची हौस आहे आणि चंद्राची सैर करु इच्छिता, तर तुम्ही मूनलँडला जाऊ शकता. तर चला मूनलँडविषयी जाणून घेऊ या...

 

मूनलँड कुठे आहे?
हे पर्यटनस्थळ भारतातील काश्मीरमध्ये आहे. ते लेहपासून केवळ 127 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थळाचे नाव लामायुरु असे आहे. जगभरातील लोक लामायुरु गावात फिरण्यासाठी येतात. विशेषतः मूनलँड पाहण्यासाठी येतात. यास चंद्राची भूमी असेही म्हटले जाते. हे गाव तीन हजार 510 मीटर उंचावर आहे.

काय आहे वैशिष्ट्ये?
असे म्हटले जाते की पूर्वी या ठिकाणी तलाव होते. त्यानंतर ते सुखून गेले. लामायुरु गावात एक मठही आहे. जे आकर्षणाचे केंद्र आहे. दुसरीकडे तलावातील पिवळी-पांढरी  माती हुबेहुब चंद्रावरील जमिनीप्रमाणे दिसते. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्राचे किरण यावर पडतात, तेव्हा जमीन चंद्राप्रमाणे चमकायला व दिसायला लागते.
 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism News Know To Moonland Traveling

Tags
टॉपिकस
Topic Tags: