esakal | ऑक्टोबरमध्ये एक आठवडा सुट्टी! भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या I Tourist Places
sakal

बोलून बातमी शोधा

Agra Taj Mahal
बऱ्याच दिवसांपासून घरी राहून कंटाळा आलाय? मग, ऑक्टोबर महिन्यात कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान करा.

ऑक्टोबरमध्ये एक आठवडा सुट्टी! भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

बऱ्याच दिवसांपासून घरी राहून कंटाळा आलाय? मग, ऑक्टोबर महिन्यात कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान बनवू शकतात. ऑक्टोबर महिना हा सुट्ट्यांनी भरलेला आहे. 14 ऑक्टोबरला राम नवमी, 15 रोजी दसरा, 16 ला शनिवार आणि 17 ला रविवार आहे. याशिवाय, 19 ऑक्टोबरला ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. दरम्यान, तुम्ही 16 ते 18 ऑक्टोबर अशी ऑफिसमधून रजा घेऊ शकत असाल, तर 6 दिवसांच्या सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. या ऑक्टोबरच्या सुट्ट्यांमध्ये कोणत्या ठिकाणांना भेट देणं चांगलं ठरेल, हे आम्ही तुम्हाला सांगू..

कोलकाता (Kolkata Tourist Places) - तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह कोलकत्याला जाऊ शकता. ऑक्टोबर महिन्यात येथे दुर्गा पूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दुर्गापूजेचा उत्सव येथे आठवडाभर असतो. याशिवाय, निक्को पार्क, व्हिक्टोरिया मेमोरियल, कालीघाटमधील कालका मंदिर आणि बेलूर मठ यासारख्या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता.

Hampi Karnataka

Hampi Karnataka

हंपी (Hampi Karnataka Tourist Places) - कर्नाटकातील हंपी शहराचं नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्येही नोंदवलं गेलंय. हे शहर त्याच्या प्राचीन मंदिरे, स्मारकं आणि अखंड रचनांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. हंपी हे ऐतिहासिक वास्तूंचा शोध घेऊ पाहणाऱ्यांसाठी योग्य ठिकाण आहे. येथे आपण विरुपाक्ष मंदिर, विजय विट्टाला मंदिर, हनुमान मंदिर, नदीकाठचे अवशेष आणि लक्ष्मी नारायण मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

आग्रा (Agra Taj Mahal) - जगातील सात आश्चर्यांमध्ये गणला जाणारा 'ताजमहाल' या शहरात आहे. यमुना नदीकाठावर बांधलेल्या ताजमहालचे नाव जगातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या प्रवास सूचीमध्ये आहे. आग्र्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे. येथे ताजमहाल व्यतिरिक्त, आपण आग्रा किल्ला, जामा मस्जिद, मेहताब बाग, अकबर-मकबरा (सिकंदरा), फतेहपूर सिक्रीला देखील भेट देऊ शकता.

Rishikesh

Rishikesh

ऋषिकेश (Rishikesh Tourism) - नैसर्गिक दृश्य असोत अथवा अॅडव्हेंचर, ऋषिकेश हे दिल्ली-एनसीआरच्या लोकांसाठी नेहमीच आवडतं ठिकाण राहिलंय. येथे आपण राफ्टिंग, कॅम्पिंग, बंजी जम्पिंग, जिप लाइनिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. नीलकंठ महादेव मंदिर, राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी पूल, नीरगढ धबधबा, ऋषिकुंड, स्वर्ग आश्रम, बीटल्स आश्रम आणि त्रिवेणी घाट हे येथील आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे.

Darjeeling

Darjeeling

दार्जिलिंग (Darjeeling West Bengal) - दार्जिलिंग वर्षभर पर्यटकांनी भरलेलं असतं. पश्चिम बंगालमध्ये असलेलं हे ठिकाण भारतातील सर्वात उंच हिल स्टेशन मानलं जातं. ऑक्टोबर महिन्यात प्रवास करण्याचा सुखद अनुभव तुम्हाला येथून परत येऊ देणार नाही. येथं येऊन तुम्ही पद्मजा नायडू पार्क, ज्यूलॉजिकल पार्क, रॉक गार्डन, पीस पॅगोडा, टायगर हिल, घुम मॉनेस्ट्री, सेंट अँड्र्यू चर्च आणि सिंगाली नेशनल पार्कल देखील पाहू शकता.

हेही वाचा: भारतातील ही आहेत सुंदर 10 बीच..येथे नक्की भेट द्या!

loading image
go to top